समान नागरी कायद्याबाबत सध्या देशभर चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समान नागरी संहितेवर (यूसीसी) उघडपणे भाष्य करायला सुरुवात केल्यापासून हा आता देशातला सर्वात चर्चिला जाणारा मुद्दा बनला आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता मोदी सरकारला मोठं समर्थन मिळालं आहे. आम आदमी पार्टीचे सरचिटणीस संदीप पाठक यांनी सांगितलं की, समान नागरी संहितेचं आम्ही तत्वतः समर्थन करत आहोत.

आपचे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले, कलम ४४ देखील असं म्हणतं की, देशात यूसीसी (यूनिफॉर्म सिव्हिल कोड) असायला हवा. परंतु आमच्या आम आदमी पार्टीला असं वाटतं की, या मुद्द्यावर देशातील सर्व धर्म आणि राजकीय पक्षांशी चर्चा व्हायला हवी. सर्वांच्या संमतीनंतरच त्याची अंमलबजावणी व्हायला हवी.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!

एकीकडे आम आदमी पार्टीने यूसीसीचं तत्वतः समर्थन केलं असलं तरी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. संदीप पाठक म्हणाले, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा भारतीय जनता पार्टी असे क्लिष्ट (किचकट) आणि गुंतागुंतीचे मुद्दे घेऊन येते.

हे ही वाचा >> ३३ वर्षांपूर्वी खून, न्यायालयीन खटल्यादरम्यान फरार, तब्बल २७ वर्षांपासून गुंगारा देणारी महिला अखेर पोलिसांच्या जाळ्यात

भाजपाच्या प्रचाराची दिशा ठरली?

‘एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळे नियम लागू होत नाहीत मग, दोन वेगवेगळय़ा कायद्यांनुसार देश कसा चालेल,’ असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे स्पष्ट शब्दांत समर्थन केले. लोकसभा निवडणुकीच्या जवळपास वर्षभर आधी भाजपच्या प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे. भोपाळमधील ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपाचा अजेंडा उलगडून सांगितला.

Story img Loader