गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगल्या कामगिरीनंतर आता आम आदमी पार्टीने गुजरातमधील विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. आम आदमी पार्टी (आप) २०२२ मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवला यांनी आज (मंगळवार) पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडवणुकी अगोदर गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचा प्रसार करण्यासाठी केजरीवाल आज अहमदाबादेत पोहचले आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत काही जणांनी आप मध्ये प्रवेश देखील केला.

”आम आदमी पार्टीचे उमेदवार सर्व जागा लढवतील. गुजरातमधील नागरिक विचार करत आहेत की, जर दिल्लीमध्ये वीज मोफत दिली जात आहे, तर मग इथं का नाही? तशाप्रकारे इथल्या रूग्णालयांची परिस्थिती देखील मागील ७० वर्षांपासून सुधारलेली नाही. मात्र आता परिस्थिती बदलेल.” असं यावेळी अरविंद केजरीवाल यांनी बोलून दाखवलं.

आणखी वाचा- बिहारमध्ये होणार राजकीय भूकंप : चिराग पासवान यांच्याविरुद्ध पाचही खासदारांचं बंड

”आज गुजरातची जी अवस्था ते भाजपा व काँग्रेस सरकारचे कारस्थान आहे. मागील २७ वर्षांमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे. असं म्हणतात की काँग्रेस भाजपाच्या खिशात आहे. गुजरातमधील व्यापारी घाबरलेले आहेत. शिक्षण खराब आहे आणि चांगल्या दर्जाचे रूग्णालयं नाहीत, करोनात गुजरात अनाथ झालं होतं. आज गुजरातला एक सक्षम पर्याय मिळाला आहे. गुजरातमध्ये वीज एवढी महाग का आहे? गुजरातमधील रुग्णालयं व शाळा चांगल्या का नाहीत? मात्र हे आता होईल.” असा विश्वासही यावेळी केजरीवाल यांनी माध्यमांद्वारे गुजरातच्या जनतेला दिला.

आणखी वाचा- लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शिवसेना, काँग्रेससोबत लढण्याबाबत राष्ट्रवादीचं मोठं वक्तव्य

अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या एका नव्या मॉडेलचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, दिल्ली मॉडेल वेगळं आहे आणि गुजरातचं एक वेगळं मॉडेल असेल. आम आदमी पार्टी गुजरातच्या लोकांच्या मुद्यांवर राजकारण करेल. २०२२ च्या निवडणुकीत येथील जनतेच्या मुद्यांवर निवडणूक लढवली जाईल आणि चेहरा देखील इथलाच असेल. पत्रकारपरिषद सुरू असतानाच गुजरातचे माजी पत्रकार इसुदान गढवी यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावर केजरीवाल म्हणाले की, इसुदान गुजरातचे केजरीवाल आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam aadmi party to contest on all seats in the 2022 gujarat legislative assembly polls cm arvind kejriwal msr