असहिष्णुतेसंदर्भातील वक्तव्यामुळे टीकेचा धनी ठरलेल्या अभिनेता आमिर खानवर भाजप नेत्यांकडून सुरू असलेली टीकेची झोड काही केल्या थांबताना दिसत नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी आमिर खानवर नवा आरोप करत वादाला तोंड फोडले आहे. ‘पीके’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खानने पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेची मदत घेतल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे. स्वामी म्हणाले की, आमीरने २००३ मध्ये ‘पीके’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आयएसआयची मदत घेतली. ‘पीके’ चित्रपटाला अर्थसहाय्य कोणी केले होते. माझ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला दुबई आणि आयएसआयकडून मदत मिळाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.  दरम्यान, स्वामींच्या या वक्तव्यावर अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया उमटलेली नाही. असहिष्णुतेसंदर्भातील वक्तव्यामुळे आमिर खान गेल्या काही दिवसांपासून वादाच्या गर्तेत सापडला आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांची नाराजी ओढवून घेतल्यामुळे आमिर खानची ‘अतुल्य भारत’ मोहिमेतून गच्छंती झाली होती.

Story img Loader