आम आदमी पक्षाचे दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) कसून प्रयत्न करत असल्याचा आरोप ‘आप’ने केल्यानंतर आज (मंगळवार) दिल्लीतील कैलाश कॉलीनी येथील भाजप नेते अरुण जेटली यांच्या निवासस्थाना बाहेर आम आदमी कार्यकर्त्यांनी जोरदार निषेधात्मक निदर्शने केली.
केजरीवाल सरकारवर अरुण जेटली यांनी जोरदार टीका केली होती. याच्या निषेधार्थ ‘आप’ कार्यकर्ते जेटलींच्या निवासस्थानी निदर्शनासाठी पोहोचले असल्याचे समजताच लगेच त्याठिकाणी भाजपचेही कार्यकर्ते जमले आणि केजरीवालांविरोधात घोषणाबाजी करून लागले. दरम्यान, भाजप आणि आप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी आणि जेटलींच्य निवासस्थानाबाहेरील सुरक्षा रक्षकांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न केले.
भाजपचे ‘आप’ल्याविरुद्ध कटकारस्थान; मोदी, जेटलींवर आरोप
यावेळी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन आम आदमी पक्षाकडून अरुण जेटलींवर निरर्थक आरोप केले जात असल्याचे भाजप नेते हरिश खुराना यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि नेते अरूण जेटली हे कटकारस्थान रचत असल्याचा आरोप सोमवारी ‘आप’चे नेते संजय सिंग यांनी केला होता.
‘आप’ भ्रष्टांच्या यादीत सोनिया, मोदी पक्षातील भ्रष्ट
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा