माहिती अधिकार कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाने सोमवारी अधिकृत नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी ही माहिती दिली. आम्ही आयोगास आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. येत्या दोन-तीन महिन्यांत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. दिल्ली विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी आम आदमी पक्षास निवडणूक चिन्ह मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. गेल्या २६ नोव्हेंबर रोजी या पक्षाची औपचारिक स्थापना करण्यात आली.
आम आदमी पक्षाचा नोंदणीसाठी अर्ज
माहिती अधिकार कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाने सोमवारी अधिकृत नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी ही माहिती दिली.
First published on: 04-12-2012 at 02:53 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap approaches ec for registration