दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन करून दगडफेक केल्याबद्दल आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष आणि शाजिया इल्मी यांच्याविरोधात दंगल घडविल्याचा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहिती अहवालात या दोन्ही नेत्यांच्या नावांचा गुरुवारी सकाळी समावेश करण्यात आला.
भाजपच्या कार्यालयाबाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या राड्याबद्दल पोलीसांनी याआधीच आपच्या १४ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आता आशुतोष आणि शाजिया इल्मी यांच्याही नावांचा समावेश एफआयआरमध्ये करण्यात आल्याने त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचे वाहन गुजरातमध्ये अडवल्यानंतर संतप्त झालेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दिल्लीतील भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी भाजप आणि आपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करीत राडा केल्यामुळे तणाव पसरला. रोड शोसाठी परवानगी न घेतल्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे कारण पुढे करीत केजरीवाल यांना गुजरातमध्ये अडविण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा