‘आम आदमी पार्टी’चे रूपांतर खाप पंचायतीत झाले असून पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल हे खाप पंचायतीप्रमाणेच निर्णय घेत आहेत, या शब्दांत शांती भूषण आणि प्रशांत भूषण या बंडखोर पिता-पुत्रांनी केजरीवाल यांच्यावर टीकेची तोफ डागली. केजरीवाल हे अ‍ॅडॉल्फ हिटलर यांच्यासारखे आहेत, असेही शांती भूषण म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, अजित झा व आनंदकुमार यांनी केलेले पक्षविरोधी वर्तन व शिस्तभंग केल्याबद्दल आम आदमी पार्टीमधून सोमवारी रात्री त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर भूषण पिता-पुत्रांनी केजरीवाल यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. ‘ही आप नसून खाप पंचायत आहे आणि या खाप पंचायतीचे हुकूमशहा आहेत, केजरीवाल. या पंचायतीचे सदस्य केजरीवाल यांच्या आदेशानुसार काम करीत आहेत, असे भूषण यांनी सांगितले. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय शिस्तभंग समितीचे सदस्य पंकज गुप्ता आणि आशीषकुमार खेतान यांच्यावरही शरसंधान करतानाच माजी पत्रकार व विद्यमान नेत्याने बातम्या पेरल्याबद्दल त्यांच्यावरही प्रशांत भूषण यांनी शरसंधान केले.

अरविंद केजरीवाल यांनी हिटलरची कार्यपद्धती अंगीकारली असल्यामुळे त्यांनी आता हिटलरचीच वेशभूषा परिधान करावी, असा ‘सल्ला’ शांती भूषण यांनी दिला.

पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना आपच्या कार्यकारिणीतून सर्वप्रथम काढून टाकण्यात आले होते. मंगळवारी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

‘आप’च्या बंडखोर नेत्यांचे नोटिसीला उत्तर