काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी निवडणूक लढवित असलेल्या रायबरेली मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश फक्रुद्दीन यांनी मंगळवारी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली आहे. ‘आप’च्या उमेदवाराने अचानक घेतलेल्या माघारीमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. फक्रुद्दीन यांनी मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. फक्रुद्दीन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याच्या वृत्ताला आपच्या नेत्यांकडूनही दुजोरा मिळाला आहे. आपण आगामी निवडणुकीसाठी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत फक्रुद्दीन यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अर्चना श्रीवास्तव यांना सोनिया गांधींविरोधात रायबरेलीतून उमेदवारी देण्याचा निर्णय आम आदमी पक्षाकडून घेण्यात आला आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा