कथित मद्यघोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले होते. त्यानुसार, त्यांना ३ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु, अरविंद केजरीवाल यांनी हे समन्स धुडकावून लावले. परिणामी आज त्यांच्या ईडीची घरावर धाड पडण्याची शक्यता असून त्यांना अटक होण्याची भीती आप नेत्यांनी व्यक्त केली आहे.

३ जानेवारी रोजी केलेल्या पोस्टमध्ये पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) संदीप पाठक म्हणाले, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्या (४ जानेवारी) सकाळी ईडीकडून छापा टाकण्याची शक्यता आहे.” मंत्री आतिशी यांनीही अशीच पोस्ट करत म्हटलं, “ईडी उद्या सकाळी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकणार असल्याची बातमी येत आहे. अटक होण्याची शक्यता आहे.” याचा अर्थ असा की आज अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता आहे. दरम्यान, आप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली असून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >> समन्स नाकारत केजरीवाल ‘ईडी’विरोधात आक्रमक; प्रश्नावलीची मागणी करत दबावाचा प्रयत्न

अरविंद केजरीवाल यांनी तीनवेळा समन्स धुडकावले

‘ईडी’ने २२ डिसेंबरला समन्स बजावून केजरीवाल यांना ३ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, केजरीवाल बुधवारी चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. यापूर्वी ‘ईडी’ने २ नोव्हेंबर व २१ डिसेंबर रोजीही चौकशीसाठी बोलावले होते पण, केजरीवाल यांनी दोन्ही वेळा समन्स धुडकावून लावले होते. १९ जानेवारीला राज्यसभेची निवडणूक असून २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आहेत. ‘आप’चा राष्ट्रीय समन्वयक व दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून राजकीय व सरकारी कामांमध्ये व्यग्र असल्याचे कारण देत केजरीवाल यांनी चौकशीसाठी येण्यास असमर्थता दाखवली आहे. तसंच, ईडी कार्यालयाच्या बाहेरही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आपच्या तीन नेत्यांना आधीच झाली आहे अटक

कथित मद्यघोटाळा प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, राज्यसभेचे खासदार संजय सिंह आणि संपर्क प्रभारी विजय नायर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सीबीआयने चौकशी केल्यानंतर मनिष सिसोदिया यांना फेब्रुवारी २०२३मध्ये अटक करण्यात आली होती, परंतु नंतर त्यांना ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या खटल्यात ताब्यात घेतले होते. संजय सिंग यांना तपास यंत्रणेने ४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घरी चौकशी केल्यानंतर अटक केली होती. तर, विजय नायर यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये सीबीआयने अटक केली होती, त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली.

Story img Loader