नवी दिल्ली : दिल्लीमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेदरम्यान पाण्याच्या टंचाईचे संकट उभे राहिले असून त्यावरून एकीकडे ‘आप’ सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. यादरम्यान, दिल्लीच्या अनेक भागांमध्ये पाण्याच्या टँकरची वाट पाहणारी आणि टँकर आल्यानंतर पाणी मिळण्यासाठी धावपळ करणारी जनता हे गेल्या काही दिवसांतील सामान्य दृश्य झाले आहे.

हेही वाचा >>>  ‘एअर इंडिया’च्या विमानाला ३० तास उशीर; प्रवाशांचे प्रचंड हाल, ‘डीजीसीए’ची कारणे दाखवा नोटीस

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

दिल्लीतील पाणीसंकटासाठी ‘आप’ आणि भाजप यांनी एकमेकांना जबाबदार धरत परस्परांवर दोषारोप केले. भाजपने दिल्ली सरकारविरोधात आंदोलन केले. दिल्लीतील पाण्याची समस्या नैसर्गिक नसून ‘आप’ सरकारचा भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन यामुळे उद्भवली आहे असा आरोप केला. भाजपला उत्तर देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही वेळ राजकारण करण्याची नाही असे सुनावले. तसेच हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील सरकारांनी एका महिन्यासाठी दिल्लीला पाण्याचा पुरवठा करावा अशी विनंती केली. दुसरीकडे, जलमंत्री आतिशी यांनी दिल्ली सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि हरियाणाने अतिरिक्त पाणी तातडीने दिल्लीला सोडावे यासाठी त्यांना निर्देश द्यावेत अशी मागणी केली. हरियाणाला हिमाचल प्रदेशने पाणी पुरवले आहे. त्यातील अतिरिक्त पाणी आपल्याला मिळावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

राज्यपालही वादात सहभागी

दरम्यान, दिल्लीतील राजकीय वादामध्ये नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनीही उडी घेतली. सक्सेना यांनी आप सरकारवर गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आणि मिर्झा गालिबचा ‘धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा’ हा शेर उद्धृत करत स्वत:ची अकार्यक्षमता, अक्षमता आणि निष्क्रियतेसाठी इतरांना दोष देणे ही आपची सवय झाली आहे अशी टीका केली.

Story img Loader