जेएनयू विद्यापीठ संकुलात आयोजित करण्यात आलेल्या वादग्रस्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमार देशविरोधी घोषणा देत असल्याचा कोणत्ही पुरावा दिल्ली सरकारने नियुक्त केलेल्या दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीतून समोर आला नाही त्यामुळे कन्हैयाला ‘क्लीन-चिट’ मिळाली आहे. कन्हैयाकुमार देशविरोधी घोषणा देत असल्याचा आरोप करण्यात आल्याने पोलिसांनी त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला.

दंडाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, विद्यापीठाच्या संकुलात कन्हैयाकुमार देशविरोधी घोषणा देत असल्याचा आरोप करण्यात आल्याने पोलिसांनी त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला.देशविरोधी घोषणा देण्यात आल्या आणि अशा घोषणा कोण देत होते ते जेएनयू प्रशासनाने निश्चित केले आहे. या व्यक्तींचा ठावठिकाणा शोधून त्यांच्या भूमिकेची चौकशी केली पाहिजे, असे चौकशी पथकाने म्हटले आहे. कन्हैयाकुमार याच्याविरुद्ध काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांना पुष्टी देण्यासाठी कोणताही साक्षादार समोर आलेला नाही अथवा तसा व्हिडीओही उपलब्ध नाही, असे अहवालता म्हटले आहे.

या कार्यक्रमाच्या सात व्हिडीओ चित्रफिती हैदराबादस्थित न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या त्यापैकी तीन फिती बनावट असल्याचे उघड झाले असून त्यामध्ये एका वृत्तवाहिनीच्या फितीचाही समावेश आहे, असे अहवालात म्हटले आहे. नवी दिल्ली जिल्हा दंडाधिकारी संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात आली. त्यांनी सांगितले की, उमर खलिद अनेक व्हिडीओ फितींमध्ये दिसत आहे आणि त्याचा काश्मीर आणि गुरूला पाठिंबा असल्याची बाब जाहीर आहे.

Story img Loader