राजकारणातील आम आदमी पार्टीच्या अप्रचलित शैलीवर सडकून टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी रविवारी ‘आप’ला पुन्हा एकदा लक्ष्य केल़े  योग्य शासनव्यवस्था न करता लोकप्रियतेसाठी केवळ अशा क्लृप्त्या करीत राहिल्यास जनतेत लवकरच त्यांचे हसे होईल अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिल्लीतील ‘आप’च्या जनता दरबाराबाबत व्यक्त केली आह़े  राज्यकारभार करण्याची वेळ येते तेव्हा ‘आप’ गोंधळलेले असल्याचे दिसून आले आह़े  त्यांची अप्रचलित शैली मुख्य राज्यकारभाराला पर्याय होऊ शकत नाही़  जबाबदार राज्यकारभार हा केव्हाही दीर्घकाळ चालणार असतो़  

Story img Loader