पीटीआय, नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप मतयाद्यांमध्ये फेरफार करीत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. यावेळी पत्रपरिषदेत राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि मुख्यमंत्री आतिशीसुद्धा उपस्थित होते. आगामी निवडणुकीत दमदार उमेदवार अथवा मुद्दे सादर करण्यास अपयश आल्यामुळेच भाजप अयोग्य मार्गाने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.

‘ऑपरेशन लोटस’ नवी दिल्ली मतदारसंघापर्यंत पोहोचल्याचा दावा करतानाच भाजप निवडणुकीचे निकाल बदलविण्यासाठीच मतयाद्यांमध्ये फेरफार करीत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. अशा प्रकारची फेरफार लोकशाही कमकुवत करते असे सांगत अशा प्रकारचा घोळ रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने पावले उचलावीत, असे आवाहनदेखील केजरीवाल यांनी केले.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना दिल्लीकरांनी का नाकारलं? ‘आप’वर मतदार असमाधानी का होते? सर्वेक्षणातून समोर आली कारणं
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
loksatta editorial on arvind kejriwal
अग्रलेख : ‘आप’ले मरण पाहिले…
Chandrashekar Bawankule statement in Pimpri after Delhi Assembly elections
“केजरीवाल, काँग्रेसला दिल्लीच्या जनतेने धु-धु धुतले”, दिल्लीच्या तख्तावर भाजपचा मुख्यमंत्री- चंद्रशेखर बावनकुळे
Why Shiv Sena Thackeray group leaders are not stopping their party defection
ठाकरे गटातील गळती का थांबत नाही ?
Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
yamuna river poisonous
यमुनेत विष मिसळल्याच्या केजरीवाल यांच्या आरोपाने खळबळ; प्रकरण काय?

हेही वाचा : सुरक्षा आघाडीवर भारत ‘कमनशिबी’! उत्तर, पश्चिम सीमेवर आव्हाने असल्याचे संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन

१५ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात फेरफार मोहिम राबविण्यात आली. नवी दिल्ली मतदारसंघातील १२ टक्के मतदार कमी होऊ शकतात, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, केजरीवाल यांच्या आरोपांवर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही.

भाजप आधीच निवडणूक पराभूत झाला आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अथवा उमेदवारीही नाही. तरीही त्यांचे लक्ष्य येनकेनप्रकारेण जिंकण्याचे आहे, परंतु त्यांचा उद्देश आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. भाजपाने एका मतदारसंघात ११००० मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज केले होते, परंतु मुख्य निवडणूक आयुक्तांनी हस्तक्षेप केल्यामुळे ते शक्य झाले नाही.

अरविंद केजरीवाल, संयोजक, ‘आप’

Story img Loader