‘आम आदमी पक्षा’चे (आप) नेते कुमार विश्वास यांनी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्चित केले असून, त्यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना येथून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे.
अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले कुमार विश्वास येत्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून लढणार आहेत. तसेच त्यांनी मोदींनाही या ठिकाणाहून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे. विश्वास म्हणाले, ”भाजपमध्ये अनेक ‘शहजादे’ आहेत. त्यामुळे आपण मोदींबरोबरच राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांनाही अमेठीतून लढण्याचे आव्हान देतो. मोदी हे राजकारण स्वच्छ करण्याबाबत फक्त बोलत आहेत. पण, प्रत्यक्षात काही करत नाहीत.” आमची लढाई कोणत्याही व्यक्तीशी नाही, तर प्रवृत्तीशी आहे.  दिल्लीतील आमचे सरकार किती काळ टिकेल, याची आम्हाला काळजी नाही. आम्ही फक्त काम करत राहणार आहे. आमचे सर्व निर्णय सर्वसामान्य जनतेमधून घेतले जातात, असेही ते पुढे म्हणाले.

Story img Loader