आम आदमी पक्षाच्या महत्त्वाच्या महिला नेत्या आणि आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवार संतोष कोळी या रविवारी झालेल्या मोटार अपघातात गंभीर जखमी झाल्या. कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात होता की घातपात असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
कोळी या आपल्या मोटारसायकलवरून काही कार्यकर्त्यांसह पक्ष कार्यालयात निघाल्या होत्या. इंदिरापूरम भागातील कौशंबी येथे त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या मोटारीने जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोळी या आम आदमी पक्षाच्या कोअर कमिटी सदस्य आहेत. याप्रकरणी लिंक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा केवळ अपघात होता की जाणीवपूर्वक केलेला हल्ला, असा प्रश्न पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर उपस्थित केला. पक्षाचे कार्यकर्ते राजन प्रकाश म्हणाले, संतोष कोळी यांना काही दिवसांपूर्वी धमक्या येत होत्या. राजकारणात येऊ नये, असे त्यांना धमकावले जात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा