पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या आमदार नरिंदर कौर भराज आणि ‘आप’ कार्यकर्ता मनदीप सिंह लखेवाल यांचा विवाह पटियालातील ‘बाबा पूरणदास डेरा’ येथे पार पडला. आमदार असतानाही कोणताही बडेजाव किंवा अमाप पैसा खर्च न करता अगदी सामान्य पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.
हेही वाचा – बांग्लादेशमधील मंदिरात अज्ञातांकडून तोडफोड, देवीच्या मूर्तीची विटंबना
२८वर्षीय ‘आप’ आमदार नरिंदर कौर भराज या पंजाबमधील सर्वात तरुण आमदार आहेत. त्यांनी संगरूर विधानसभा मतदार संघातून पहिल्याच निवडणूक लढवत ३८ हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. त्या यापूर्वी ‘आप’च्या माध्यम संयोजक होत्या. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भराज यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री विजय इंदर सिंघला यांच्या परावभव केला होता.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – भारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा
तर मनदीप सिंह लखेवाल हे भवानीगडचे रहिवासी असून ते आपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. तसेच त्यांनी संगरूर मतदारसंघात माध्यम संयोजक म्हणूनही काम पाहिले आहे.