आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी शनिवारी सक्तवसुली संचालनालयाला म्हणजेच ईडीला मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी ही नोटीस ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा आणि कथित घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी करणारे तपास अधिकारी जोगेंदर यांना पाठली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ४८ तासांच्या आत माफी मागावी, अशी मागणी संजय सिंह यांनी केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईसाठी तयार राहा, असा इशाराही सिंह यांनी दिला आहे.
आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दावा केला आहे की, “ईडीने जाणून बुजून चार्जशीटमध्ये माझं नाव टाकलं आहे. कोणत्याही साक्षीदाराने माझं नाव घेतलेलं नाही. तरीदेखील या खटल्यात माझं नाव गोवून सक्तवसुली संचालनालयाने मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं आहे. मुळात माझ्याविरोधात त्यांच्याकडे एकही साक्षीदार नाही.”
हे ही वाचा >> “तानाजी सावंतांना शिक्षणमंत्री करणार होतो, पण…”, ठाणे रुग्णालयाच्या भूमिपूजनावेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, म्हणाले…
गुन्हा दाखल करण्याचा इशारा
आपचे नेते संजय सिंह गुरुवारी म्हणाले होते की, दिल्लीतल्या कथित मद्य घोटाळा प्रकरणाच्या आरोपपत्रात चुकीच्या पद्धतीने माझं नाव टाकल्याबद्दल मी ईडीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मानहानीचा फौजदारी खटला दाखल करेन.