केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांच्याविरोधात निवडणूक लढविणा-या फारूखाबाद मतदारसंघातील ‘आम आदमी पक्षा’चे उमेदवार मुकूल त्रिपाठी यांनी माघार घेत ‘आप’मध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला आहे. याप्रकारामुळे ‘आम आदमी पक्षा’ला जोरदार झटका मिळाला आहे. मुकूल त्रिपाठी यांनी आपल्याला पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळत नसल्यामुळे आपण लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून मिळालेले तिकीट परत करत असल्याची माहिती दिली. तसेच आपण ‘आम आदमी पक्षा’त भ्रष्टाचार होत असल्याचा दावा करत मुकूल त्रिपाठी यांनी ‘आप’चा राजीनामा दिला आहे. फारूखाबाद मतदारसंघातील आपच्या निवडणूक प्रचाराच्या प्रमुखपदी असणा-या व्यक्तीने आपल्याला विविध भागांमध्ये प्रचार करण्यासाठी पक्षाला ‘ताकद’ देण्यास सांगितले. तसेच फारूखाबाद मतदारसंघात ‘आप’च्या प्रमुख नेत्यांच्या सभा आयोजित करण्यासाठी ‘जुगाड’ करण्यास सुचविले असल्याचा आरोप मुकूल त्रिपाठी यांनी केला आहे. 

Story img Loader