नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, सोमवारी, विरोधक आणि सत्ताधारी यांचा गोंधळात गोंधळ सुरू होता. संसदेच्या आवारातील गांधी पुतळय़ापासून सभागृहांपर्यंत दोन्ही बाजूंच्या सदस्यांची जुगलबंदी पाहायला मिळाली.सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधी भाजपचे राजस्थानमधील खासदार गांधी पुतळय़ाच्या शेजारी उभे राहून घोषणाबाजी करत होते. काँग्रेसचे सरकार असलेल्या राजस्थानमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली असल्याचा आरोप दिया कुमार आदी खासदार करत होते. भाजपच्या खासदारांची निदर्शने सुरू असतानाच तेथे विरोधी पक्षाचे सदस्यही मणिपूरच्या मुद्दय़ावर निदर्शने करण्यासाठी आले. संसदेच्या आवारात गांधी पुतळय़ाशेजारीच निदर्शने केली जात असल्याने विरोधी पक्षांच्या सदस्यांनाही तेथेच घोषणाबाजी करायची होती. सभागृहाचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्यामुळे त्याआधी विरोधकांना निदर्शने करायची होती. मात्र, भाजपचे खासदार तेथून जायला तयार नव्हते. त्यामुळे विरोधी सदस्यांनी संसदेच्या पायऱ्यांवर उभे राहून घोषणाबाजी केली.

गेल्या आठवडय़ातील दोन्ही दिवशी लोकसभेचे कामकाज न झाल्याने लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. अर्धा तास कामकाज झाले तरी विरोधकांनी गदारोळ कायम ठेवला. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना- ठाकरे गटाचे खासदार वगळता काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आदी पक्षांचे सदस्य लोकसभाध्यक्षांच्या मोकळय़ा जागेत फलक घेऊन गोंधळ घालत असल्याने सभागृह तहकूब करावे लागले.

Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Aditya Thackeray Nana Patole Said This Thing
Mahavikas Aghadi : विधानसभेत महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, आदित्य ठाकरे, नाना पटोले काय म्हणाले?

विरोधकांच्या मणिपूरच्या मुद्दय़ाला सत्ताधारी भाजपने पश्चिम बंगाल व राजस्थानमधील महिला अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख करत प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट झाले. अनुराग ठाकूर, मनोज तिवारी आदी भाजपच्या खासदारांनी काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या राज्यांतील अत्याचाराच्या घटनांचा जाणीवपूर्वक उल्लेख करत, या मुद्दय़ांवरही सभागृहांमध्ये चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली.

Story img Loader