नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, सोमवारी, विरोधक आणि सत्ताधारी यांचा गोंधळात गोंधळ सुरू होता. संसदेच्या आवारातील गांधी पुतळय़ापासून सभागृहांपर्यंत दोन्ही बाजूंच्या सदस्यांची जुगलबंदी पाहायला मिळाली.सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधी भाजपचे राजस्थानमधील खासदार गांधी पुतळय़ाच्या शेजारी उभे राहून घोषणाबाजी करत होते. काँग्रेसचे सरकार असलेल्या राजस्थानमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली असल्याचा आरोप दिया कुमार आदी खासदार करत होते. भाजपच्या खासदारांची निदर्शने सुरू असतानाच तेथे विरोधी पक्षाचे सदस्यही मणिपूरच्या मुद्दय़ावर निदर्शने करण्यासाठी आले. संसदेच्या आवारात गांधी पुतळय़ाशेजारीच निदर्शने केली जात असल्याने विरोधी पक्षांच्या सदस्यांनाही तेथेच घोषणाबाजी करायची होती. सभागृहाचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्यामुळे त्याआधी विरोधकांना निदर्शने करायची होती. मात्र, भाजपचे खासदार तेथून जायला तयार नव्हते. त्यामुळे विरोधी सदस्यांनी संसदेच्या पायऱ्यांवर उभे राहून घोषणाबाजी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा