Delhi Elections Exit Polls : दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ साठीचे मतदान काल (५ फेब्रुवारी) पार पडले आहे. या निवडणुकीत भाजपा सत्तेत येणार असा अंदाज एग्झिट पोल्सच्या अंदाजात व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी मात्र गुरूवारी निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा अंदाज व्यक्त करणारे हे एग्झिट पोल फेटाळून लावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मसाज देणाऱ्या आणि स्पा चालवणाऱ्या कंपन्या एग्झिट पोल घेत असतील तर तुम्ही एग्झिट पोलची स्थिती समजू शकता. मी फक्त सर्वांना विनंती करतो की तुम्ही ८ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहा, असे सिंह हे पीटीआयशी बोलताना म्हणाले.

“आप दिल्लीत मोठ्या बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांशी जनता सहमत आहे,” असेही सिंह पुढे बोलताना म्हणाले.

एग्झिट पोलमध्ये भाजपाला विजय

अनेक एक्झिट पोलमध्ये दिल्लीत सत्ताधारी आपला खाली खेचून भारतीय जनता पक्ष सत्तेत येणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काँग्रेस पक्षाला आणखी एक पराभवाचा धक्का बसणार असल्याचेही एग्झिट पोलचे अंदाज दर्शवत आहेत.

मॅट्रिझ एग्झिट पोलने (Matrize exit poll) दिल्ली चुरसीची लढत होईल अंदाज वर्तवला आहे . त्यांच्या अंदाजानुसार भाजपाला ३५-४० जागा मिळतील, तर आपला ३२ ते ३७ जागा मिळतील असा अंदाज आहे. विशेष बाब म्हणजे या सर्वेक्षणात काँग्रेसला शून्य ते एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

द पीपल्स पल्स एग्झिट पोलनुसार एनडीएला ५१ ते ६० जागा मिळतील तर आपला १० ते १९ जागांवर विजय मिळेल, काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही.

पीपल्स इनसाइट एग्झिट पोलनुसार एनडीएला ४० ते ४४ जागा मिळतील, आप २५ ते २९ जागा आणि काँग्रेसला शून्य ते एक जागा मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पी-मार्कच्या एग्झिट पोलच्या (P-Marq exit poll) अंदाजानुसार भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि त्यांच्या मित्रपक्षांना ३९ ते ४९ जागा, आपला २१ ते ३१ जागा आणि काँग्रेसला शून्य ते एक जागा मिळण्याचा अंदाज आहे.

जेव्हीसीच्या एग्झिट पोलमध्ये भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना ३९ ते ४५ जागा, आपला २२ ते ३१ जागा आणि काँग्रेसला शून्य ते दोन जागा मिळतील असे म्हटले आहे.