बंडखोरांविरुद्ध अंतिम कारवाईचे पाश आणखी आवळत आम आदमी पक्षाने बरखास्तीच्या बेतात असलेल्या योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या बंडखोर नेत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची तयारी केली आहे.
याआधी या दोघांचे प्रकरण राष्ट्रीय शिस्तभंग समितीकडे पाठवणाऱ्या ‘आप’ने या दोघांविरुद्धच्या आरोपांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.