दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ‘आप’ पक्षाला सहआरोपी करण्यात येणार असल्याचे आज ईडीने उच्च न्यायालयात सांगितले. आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर आज सुनावणी होत असताना ईडीच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला ही माहिती दिली. सिसोदिया यांच्याविरोधात अबकारी धोरण प्रकरणात मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यासंबंधी आज जामिनावर सुनावणी झाली. एखाद्या पक्षालाच सहआरोपी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते

मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जाला विरोध करत असताना ईडीने सांगितले की, मद्य धोरण प्रकरणाचा खटला लांबविण्यासाठी आरोपींकडून ठोस प्रयत्न केले जात आहेत. दिल्लीमध्ये ‘आप’डून २०२१-२२ मध्ये उत्पादन शुल्क धोरणात बदल करण्यात आला होता. या बदलाच्या माध्यमातून मनी लाँडरिंगचा गुन्हा घडल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
Sanjay Raut
Ladki Bahin Yojana : “१५०० रुपयांच्या बदल्यात बहि‍णींच्या घरात दारूडे…”; लाडकी बहीण योजनेवरून राऊतांची अजित पवारांवर टीका
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
court advised police to select only government employees while selecting witnesses
“शासकीय कर्मचाऱ्यांनाच साक्षीदार करा,” उच्च न्यायालयाने असा सल्ला का दिला?

‘मोदी लवकरच होणार निवृत्त; अमित शाह पंतप्रधान तर योगी आदित्यनाथ…’, केजरीवाल यांचा मोठा दावा

ईडीने आरोप केला की, या प्रकरणात गुंतलेल्या दक्षिण गटाने (South Group) उत्पादन शुल्क धोरण बदलण्यासाठी १०० कोटी रुपयांची लाच देण्याचे ठरविले होते. त्यापैकी ४५ कोटी रुपये किकबॅकच्या स्वरुपात दिले होते. हे पैसे आम आदमी पक्षाकडून २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आले. तसेच या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत, असाही आरोप ईडीने केला.

ईडीने या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपपत्रे दाखल केली आहेत. १० एप्रिल रोजी ताजे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये भारत राष्ट्र समितीच्या नेत्या, आमदार के. कविता आणि इतर चार जणांना आरोपी म्हणून जाहीर केले. त्याआधीच १५ मार्च रोजी के. कविता तर २१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. १० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

Story img Loader