गांधी-नेहरू घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून निवडणूक लढवण्यासाठी  ‘आम आदमी पक्षा’ने (आप) शड्ड ठोकले आहे. हा मतदारसंघ विकासापासून दूर आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्दय़ावर या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत, असे ‘आप’ने मंगळवारी स्पष्ट केले.
‘‘माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र तरीही या मतदारसंघाचा विकास झालेला नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही येथून निवडणूक लढवणार आहोत,’’ असे ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी सांगितले. जनता घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळली असून, आता त्यांना विकास पाहिजे, असे सिंह यांनी सांगितले.
१२ जानेवारी रोजी पक्षाची अमेठीत सभा होणार असून, कुमार विश्वास यांचे भाषण होईल.

Story img Loader