Punjab CM Replace: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव आणि त्यातही ‘आप’चे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल पराभूत झाल्यानंतर पक्षासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. त्यातच पंजाबमधील ‘आप’ सरकारबद्दल अनेक वावड्या उठत आहेत. पंजाबचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा आरोप केला जात आहे. तर काही ठिकाणी भगवंत मान यांना हटविले जाणार अशी चर्चा सुरू आहे. यावर आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत यांनीच खुलासा केला आहे. दिल्ली येथे आज अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत पंजाबमधील सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भगवंत मान यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

दिल्लीमधील मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निवासस्थान असलेल्या कपूरथाला हाऊसमध्ये आम आदमी पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीपूर्वी भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दावा केला होता की, अरविंद केजरीवाल हे भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवू इच्छित आहेत. राजौरी गार्डन येथील भाजपाचे आमदार मजिंदर सिंग सिरसा यांनी हा दावा केला की, भगवंत मान अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याचा ठपका ठेवून त्यांना बाजूला केले जाईल.

stock market crash
Why market is falling today: सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी गायब, बाजार कोसळण्याची काय कारणं आहेत?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Tanaji Sawant Son Missing
Tanaji Sawant Son Missing : तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सावंत सुखरुप परतला; नेमकं काय झालं होतं? पुणे पोलिसांनी दिली मोठी माहिती
Devendra Fadnavis
Maharashtra Breaking News LIVE Updates : कॉपीबहाद्दरांना आता अद्दल घडणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय; सामूहिक कॉपी आढळल्यास थेट केंद्राची मान्यता रद्द!
BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
ranveer allahbadia on indias got latent video
Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्याचे पडसाद संसदेत उमटले, अश्लील जोकच्या मुद्द्यावरुन कोण काय म्हणालं?
PM Narendra Modi Speech in Paris
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “AI मुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, कुठलंही तंत्रज्ञान….”
next cm in delhi wont stay in sheeshmahal
Delhi CM: दिल्लीतला ‘शीशमहल’ ओस पडणार? भाजपाचे मुख्यमंत्री निवासस्थान बदलणार!

भाजपाचे नेते मजिंदर सिंग सिरसा यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते म्हणाले, “आप पक्ष दिल्लीत पराभूत झाला, पण बैठक पंजाबच्या आमदारांची बोलावली आहे. कारण मासा जसा पाण्याबाहेर राहू शकत नाही, तसे केजरीवाल यांचे झाले असून त्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यांना उंची जीवनशैलीची सवय झाली आहे. त्यामुळेच ते पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचे स्वप्न पाहत आहेत.”

सिरसा पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री भगवंत मान हे भ्रष्टाचार, अमली पदार्थांची तस्करी रोखू शकले नाहीत, असा आरोप करत त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जात आहे. भगवंत मान अपयशी झाले, हे जरी खरे असले तरी अरविंद केजरीवाल सहजासहजी पंजाबचे मुख्यमंत्री होतील, असे होऊ शकणार नाही.

मुख्यमंत्री भगवंत मान यांना जेव्हा या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या. आम्ही जी आश्वासने दिली होती, ते पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

तसेच काँग्रेसचे नेते प्रताप सिंह बाजवा यांच्या आरोपालाही मान यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आपचे २० आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. हा दावा ते गेल्या तीन वर्षांपासून करत आहेत. पण मी त्यांना विचारतो की, सलग तिसऱ्यांदा तुमचे दिल्लीत किती आमदार निवडून आले. त्याचा आकडा आधी सांगा.

पंजाबच्या विधानसभेत ११७ आमदारांपैकी ९३ ‘आप’चे आमदार आहेत. तर काँग्रेसकडे १६ आमदार आहेत.

Story img Loader