नवी दिल्ली : वटहुकमाच्या विरोधात काँग्रेसने पाठिंबा दिला नाही तर, पाटण्यातील महाआघाडीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आम आदमी पक्षाने गुरुवारी दिला. मात्र, २० भाजपेतर पक्षांच्या प्रमुखांना मोठय़ा कष्टाने बैठकीसाठी एकत्र आणले असल्याने ‘आप’ची खेळी यशस्वी होऊ न देण्याचे प्रयत्न बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडून केले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्लीतील राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या वटहुकमाविरोधात काँग्रेस वगळता अन्य भाजपेतर पक्षांनी ‘आप’ला उघड पिठबा दिला आहे. या संदर्भात ‘आप’ने सर्व विरोधी पक्षांना पत्र पाठवले होते. त्यानंतरही काँग्रेसने भूमिका स्पष्ट न केल्यामुळे ‘आप’ने महाआघाडीच्या बैठकीत विघ्न आणण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. काँग्रेसने वटहुकमाच्या मुद्दावर पाठिंबा दिला नाही तर महाआघाडीच्या बैठकीतून अरविंद केजरीवाल उठून निघून जातील आणि भविष्यात विरोधी पक्षांच्या कुठल्याही बैठकीमध्ये ‘आप’ सहभागी होणार नाही, असा दावा ‘आप’च्या सूत्रांनी केला.

महाआघाडीची शुक्रवारी होणारी पहिलीच बैठक अपयशी झाली तर पुन्हा विरोधक एकत्र येण्याची शक्यता संपुष्टात येईल. हा धोका ओळखून बैठकीमध्ये ‘आप’चा मुद्दय़ावर चर्चा केली जाण्याची शक्यता नसल्याचे संकेत नितीशकुमारांनी दिले आहेत. केंद्रातील भाजप सरकार कोणाच्याही हिताचे नाही. महाआघाडीची बैठक देशभरात भाजपविरोधी एकजुटीसाठी बोलावण्यात आली आहे. त्यामुळे अजेंडय़ावरील प्रमुख मुद्दय़ावरच चर्चेत भर दिला जाईल. राज्यातील विशिष्ट मुद्दय़ांवर या बैठकीत चर्चा केली जाणार नाही. हे प्रश्न राज्यस्तरावर एकमेकांशी संवाद साधून सोडवता येतील, असे नितीशकुमार यांनी पाटण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

एका बाजूला ‘आप’कडून धमकी दिली जात असली तरी, पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल मात्र बैठकीच्या एक दिवस आधी, गुरुवारीच पाटण्यात दाखल झाले असून त्यांनी जनता दलाचे (सं) प्रमुख नितीशकुमार यांची भेटही घेतली. या भेटीपूर्वीच नितीशकुमार यांनी ‘आप’च्या भूमिकेकडे फारसे लक्ष दिले जाणार नसल्याचे सूचित केले. ‘आप’च्या इशाऱ्याला काँग्रेसने सज्जड प्रत्युत्तर दिले. महाआघाडीच्या बैठकीवर ‘आप’ने बहिष्कार टाकला तरी चालेल. केजरीवालांच्या अनुपस्थितीमुळे कोणालाही फरक पडणार नाही. महाआघाडीच्या बैठकीत ‘आप’ला सहभागी व्हायचे नसल्याने कारणे शोधली जात आहेत. (भाजपशी) छुपी युती करणाऱ्यांना महाआघाडीत स्थान नाही, अशी टीका दिल्ली काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी केली.