Premium

“मोदी पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन” आप नेते सोमनाथ भारतींना वक्तव्य पडले महागात, भाजपा नेत्यांनी भर बाजारात…

दिल्ली मध्ये सुद्धा आप आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होती. आता दिल्लीत भाजप सातही जागेवर आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपचा जल्लोष दिसून येतोय. पीटीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भाजप कार्यकर्ते एका व्यक्तीचे मुंडन करताना दिसत आहे. वाचा, काय आहे प्रकरण?

AAPs candidate Somnath Bharti said he shave off his head if narendra modi will become PM
"मोदी पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन" आप नेते सोमनाथ भारतींना वक्तव्य पडले महागात (Photo : PTI/X)

Lok Sabha Election Result : देशात नुकतीच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली आणि या निवडणूकीचा निकाल आज ४ जाहीर होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे आहे. जसा निवडणूकीचा कल समोर आहे तशी सर्वांची धाकधूक वाढत आहे. दिल्ली मध्ये सुद्धा आप आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होती. आता दिल्लीत भाजप सातही जागेवर आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपचा जल्लोष दिसून येतोय. पीटीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भाजपा कार्यकर्ते एका व्यक्तीचे मुंडन करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपू्र्वी आप नेते सोमनाथ भारती यांनी एक वक्तव्य केले होते. जर मोदी पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, असे त्यांनी ट्विट करत सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. त्यांनी लिहिले होते, “जर मोदी तिसऱ्यांना पंतप्रधान झाले तर मी मुंडन करीन. माझे शब्द लक्षात ठेवा. ४ जून रोजी सर्व एक्झिट पोल चुकीचे ठरतील आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही. दिल्लीमध्ये सर्व सात जागा या इंडिया आघाडीला जातील.”

पाहा व्हायरल पोस्ट

आता दिल्लीमध्ये भाजप सातही जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे भाजपा नेत्यांनी दिल्लीतील गोले बाजारात एका व्यक्तीचे मुंडन करत सोमनाथ भारती यांना उत्तर दिले आहे. पीटीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हााला दिसेल की भाजप एका व्यक्तीचे मुंडन करत जल्लोष साजरा करताना दिसत आहे.

भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला आहे. याआधी भाजपाने २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं होतं. यावेळी भाजपाने स्वतः ३७० जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आता आपण जाणून घेऊ भाजपाने २०१४ मध्ये किती जागा लढवल्या आणि २०१९ मध्ये किती जागा लढवल्या?

२०१४ मध्ये भाजपाने ४२८ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी २८२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर २०१९ ला भाजपाने ४३६ जागांवर निवडणूक लढवली आणि ३०३ जागा मिळवल्या होत्या. भाजपाने २०१४ आणि २०१९ या दोन्ही वर्षांमध्ये बहुमताच्या संख्येपक्षा जास्त जागा मिळवल्या. आता या खेपेला म्हणजेच २०२४ मध्ये भाजपाने ४४१ जागा लढवल्या आहेत. तर १०२ जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत. आता या यावेळी ४४१ पैकी ३७० जागा भाजपा जिंकतंय का हे आज स्पष्ट होणार आहे. २०१९ मध्ये भाजपाला जी मतं मिळाली त्याची सरासरी २०१४ च्या तुलनेत अधिक होती. २०१९ मध्ये भाजपाच्या विजयाचा स्ट्राईक रेट हा ६९ टक्क्यांवर पोहचला होता. आता या वेळी काय निकाल लागतो? एकट्या भाजपाला किती जागा मिळतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aaps candidate somnath bharti said he shave off his head if narendra modi will become pm bjp workers imitate to shave the head of a man as bjp ahead in all seats in delhi ndj

First published on: 04-06-2024 at 14:22 IST
Show comments