प्रक्षोभक भाषण केलेल्या ध्वनिचित्रफितींच्या आधारे आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रक्षोभक भाषणातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप कुमार विश्वास यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
श्रीराम जन्मभूमी सेवा समितीचे सरचिटणीस आर. पी. मिश्रा यांनी कुमार विश्वास यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. हिंदू देवतांविरुद्ध त्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मिश्रा यांनी पोलीसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. त्यानंतर पोलीसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम २९५ आणि २९५ (अ) नुसार रविवारी रात्री गुन्हा दाखल केला. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे महानगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.

Story img Loader