दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीची (आप) जादू उत्तर प्रदेशात चालणार नाही, असा दावा सपाचे नेते शिवपाल यादव यांनी केला आहे. राज्यात सपाशी ज्यांनी दोन हात केले ते टिकून राहिले नाहीत, असा दावाही यादव यांनी केला. आप ही नवी राजकीय शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचे म्हणणेही त्यांनी फेटाळले.
उत्तर प्रदेशात आपची जादू चालणार नाही, उत्तर प्रदेशात असे अनेक पक्ष आले, मात्र उत्तर प्रदेशात केवळ सपाच आहे, आमच्याशी ज्यांनी दोन हात करण्याचा प्रयत्न केला ते टिकले नाहीत, असेही शिवपाल यादव यांनी वार्ताहरांना सांगितले.
आप पक्ष बोलघेवडा आहे, त्यांनी कमी बोलावे आणि काही काम करावे, असा आपला त्यांना सल्ला आहे. जे बोलघेवडे आहेत ते लवकरच संपुष्टात येतात, असेही यादव म्हणाले. त्यापूर्वी त्यांच्या हस्ते २२ मोठय़ा पुलांचे आणि १२ छोटय़ा पुलांचे उद्घाटन करण्यात आले.