लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली जोधपूर तुरुंगात असलेल्या आसाराम बापूंच्या विरोधात बलात्काराची आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साई या दोघांच्या विरोधात बलात्काराची तक्रार सुरतमधील दोघा बहिणींनी केली आहे. आसाराम आणि नारायण साई यांच्या विरोधात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्याचे सुरतचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले. मोठय़ा बहिणीने आसाराम यांच्या विरोधात, तर नारायण साई यांच्या विरोधात छोटय़ा बहिणीने तक्रार केली आहे. या घटना २००१ ते २००६ या दरम्यानच्या आहेत.
आसाराम बापूंच्या मुलाचीही ‘लीला’!; महिलेची फसवणूक
आसाराम बापूंना लैंगिक शोषणाप्रकरणी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पीडित बहिणी समोर आल्या असून, त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या दोन्ही बहिणी आता विवाहित आहेत आणि दहा वर्षांपूर्वी या दोघांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शिवाच्या मोबाईलमधील क्लिपमध्ये आसाराम बापूंच्या ‘लीला’!
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी कोठडीत असलेल्या आसाराम बापूंच्या अडचणीत भर पडली आहे. या दोन्ही बहिणींच्या तक्रारीवरून गुजरात पोलिसांनी चौकशीस सुरवात केली आहे. त्यामुळे त्यांचा मुलगा साईंनाही अटक होण्याची शक्यता आहे.
आसाराम पितापुत्रांवर बलात्काराचा आरोप
आसाराम बापूंच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधातील गुन्ह्याची मालिका कायम आहे.
First published on: 07-10-2013 at 12:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aasaram bapu in trouble again