अटक करण्यात आलेला दहशतवादी अब्दुल करीम ऊर्फ टुंडा याचा मुलगा अब्दुल वारिस हा सध्या जम्मू-काश्मिरमध्ये लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेसाठी कार्यरत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने नुकतेच टुंडा याला भारत-नेपाळ सीमेवर अटक केली होती. त्यानंतर त्याला दिल्ली न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सध्या टुंडा पोलीस कोठडीत असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत आतापर्यंत टुंडाने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. दरम्यान, आता त्याने आपला मुलगा लष्कर-ए-तैयबासाठी काम करत असल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टुंडाची दुसरी पत्नी मुमताज हीचा तिसरा मुलगा अब्दुल वारिस हा जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये कार्यरत आहे. इतकेच नाही तर टुंडाच्या मुलाने भारतामध्ये आठ वर्षांचा तुरूंगवासही भोगला आहे. तुरूंगवास भोगल्यानंतर वारिस पाकिस्तानमध्ये वडिल टुंडाना भेटला आणि तेथूनच लष्कर-ए-तैयबामध्ये सहभागी झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा