अखिल भारत हिंदू महासभेने (एबीएचएम) नवरात्री उत्सवाच्या काळात दुर्गा देवीच्या पायाजवळ महात्मा गांधी सदृश्य महिषासुर राक्षसाची मूर्ती वापरली होती. या प्रकारानंतर सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आला. ही घटना ताजी असताना आता अखिल भारत हिंदू महासभेनं चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो लावावा, अशी मागणी केली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान महात्मा गांधींपेक्षा कमी नाही. त्यामुळे चलनी नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो बदलून त्याऐवजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो लावावा, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेने केली आहे. याबाबतचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं वृत्त दिलं आहे.

हेही वाचा- विश्लेषण : नोटांवर महात्मा गांधींचा फोटो कधी आणि का छापला? वाचा इतिहास…

ABHM ने अलीकडेच आयोजित केलेल्या दुर्गा पूजेमध्ये महिषासुर राक्षस म्हणून महात्मा गांधींशी मिळती-जुळती मूर्ती बसवली होती. यानंतर आता चलनी नोटेवरील फोटो बदलण्याची मागणी या संघटनेनं केली आहे.

हेही वाचा- आता न्यूयॉर्कमध्ये धुमधडाक्यात साजरी होणार दिवाळी, शाळांना मिळणार सार्वजनिक सुट्टी

“आम्हाला वाटतं की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं योगदान महात्मा गांधींपेक्षा कमी नव्हतं. त्यामुळे भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी नेताजींना सन्मानित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चलनी नोटांवर त्यांचा फोटो लावणे हा आहे. गांधींच्या फोटोऐवजी नेताजींचा फोटो लावला पाहिजे,” अशी मागणी एबीएचएमचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रचूर गोस्वामी यांनी पत्रकार परिषदेत केली.

Story img Loader