केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले होते. त्यानंतर बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर सभागृहात चर्चा झाली. यामध्ये सत्ताधारी खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मते व्यक्त केली. तर विरोधकांनी याला जोरदार विरोध केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं आहे.

२८८ मतं विधेयकाच्या बाजूने

मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. यावेळी विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली. दरम्यान वक्फ दुरूस्ती विधेयकावरील मतदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.

अमित शाह काय म्हणाले?

संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण ताकदीने त्याचे समर्थन केले. ते म्हणाले, “माझ्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्याने मांडलेल्या विधेयकाचे मी समर्थन करतो. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू असलेली चर्चा मी लक्षपूर्वक ऐकत आहे. मला वाटते की अनेक सदस्यांचे खरोखरच किंवा राजकीय कारणांमुळे अनेक गैरसमज आहेत.” दरम्यान याबाबत आता प्रत्रक्रिया येत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी या विेधयेकाला आमचा विरोध काय राहिल असं म्हटलंय.

इरादे खंजर के नेक तो हो नहीं सकते. ज्या लोकांनी सरकार आल्यानंतर मुस्लिमांच्या हितांसाठी एकही काम केलं नाही. तसंच जे लोक मशिदींखाली मंदिरं शोधत आहेत. मंदिरांच्या बाहेर लोक उभे राहिले तर चालतं पण नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम रस्त्यावर आले तर त्यांचं पासपोर्ट रद्द केलं जाईल असा नियम केला आहे असलं सरकार जे बिल आणतं आहे ते मुस्लिमांच्या बाजूने असूच शकत नाही. आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेल्या जमिनींवर या सरकारला कब्जा करायचा आहे. या जमिनींवर क्रबस्तान आहेत आणि मशिदी उभ्या आहेत अशा जमिनींवर सरकारवर डोळा आहे. या सरकारला हिंदू राष्ट्र करायचं आहे मुस्लिमांना दुय्यम दर्जा द्यायचा आहे. असंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे. आम्ही या विधेयकाचा विरोध करत आहोत, यापुढे करत राहू.

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी जुन्या वक्फ विधेयकाच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले, “१९५४ मध्ये संसदेच्या सदस्यांनी विधेयकाला विरोध करूनही, काँग्रेस पक्षाने मुस्लिमांना खुश करण्यासाठी वक्फ कायदा मंजूर केला. वक्फला दुसऱ्या कोणत्याही देशात असे अधिकार देण्यात आलेले नाहीत, तुम्हाला भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचे आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला.