चेन्नई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ. सुबय्या शण्मुगम यांनी चेन्नईतील एका उपनगरात गृहनिर्माण संस्थेतील पार्किंगच्या वादातून बासष्ट वर्षीय विधवा महिलेची छळवणूक केल्याचा आरोप आहे. तिच्या दारात जाऊन मूत्रविसर्जन केले, तसेच शस्त्रक्रियेसाठी वापरलेल्या मुखपट्टय़ा तिच्या सदनिकेजवळ  फेकल्याची तक्रार या महिलेने पोलिसांत केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या महिलेच्या मालकीची पार्किंगची जागा असून  डॉ. शण्मुगम यांच्याकडे तिने ही जागा वापरण्याच्या बदल्यात मोबदला म्हणून पैसे मागितले होते.  तिने अदमबक्कम पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून  घटनेचे चित्रण व छायाचित्रे जोडली आहेत.

तक्रारदार महिलेचे पुतणे बालाजी विजयराघवन हे कनार्टकी संगीत कार्यक्रमांचे आयोजन करतात.  त्यांनी या  घटनेची माहिती प्रसारित केली. यात पोलिस सहकार्य करीत नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते.

पोलिसांनी सांगितले, की महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला असून तक्रारीची पोच देण्यात आली आहे. शण्मुगम हे रोयापेट रुग्णालय व किलपॉक वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक असून त्यांनी सांगितले, की ही तक्रार खोटी असून सीसीटीव्ही चित्रणही बनावट आहे. यात काही वेगळेच हेतू असण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही विचारायचे असेल तर अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना विचारा.

अभाविपच्या राष्ट्रीय सरचिटणीस निधी त्रिपाठी यांनी सांगितले, की शण्मुगम कुटुंबीय व तक्रारदार महिला यांच्यात पार्किंगच्या जागेवरून वाद झाला होता. त्यांच्यात चर्चा झाली होती. महिलने छळवणुकीचे जे आरोप केले आहेत ते गैरसमजातून केले असून ते खोटे आहेत.

अभाविपने या महिलेवर बदनामीचा खटला भरण्याचा इशारा दिला आहे.

महिलेने तक्रारीत म्हटले होते, की शण्मुगम हे दोन पार्किंग जागांपैकी एक वापरू देण्याची मागणी करण्यासाठी माझ्याकडे आले. पण त्यासाठी मी नाममात्र भाडे देण्याचे सुचवले. नंतर ते संतप्त झाले व त्यांनी पार्किंग च्या जागेवरचा फलक तोडला. नंतर ते मला फोन करीत राहिले, मी शाकाहारी असताना, तुम्हाला चिकन पाहिजे  का, असे  विचारत राहिले. नंतर माझ्या दाराशी येऊन वापरलेल्या शस्त्रक्रियेच्या मुखपट्टय़ा टाकल्या, चिकनचे तुकडे, केर व इतर घाण आणून टाकली. लघवीही केली.

विजयराघवन यांनी सांगितले, की  मला हा सगळा प्रकार तिने कथन केला. जर शण्मुगम यांनी चूक कबूल करुन माफी मागितली असती तर आम्ही मान्य केले असते, पण त्यांनी तसे  केले नाही.