दिल्लीच्या देशबंधू महाविद्यालयात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या सबरंग या वार्षिक कार्यक्रमादरम्यान लोखंडी खांब कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक विद्यार्थी जखमी झाला आहे. स्टेजवर कोसळणाऱ्या लोखंडी खांबाखाली आल्याने त्याच्या पाठीला आणि तोंडाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या फोर्टिस रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्टेजवर फॅशन शो सुरू असताना ही दुर्घटना घडली. अरबिंदो महाविद्यालयातील विद्यार्थी यावेळी स्टेजवर रॅम्पवॉक करत होते. तेव्हा लाईट आणि स्पिकर्ससाठी उभारण्यात आलेली लोखंडी चौकट अचानकपणे स्टेजवर येऊन कोसळली. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, ही लोखंडी चौकट कोसळताना अन्य विद्यार्थ्यांनी वेळीच पळ काढल्याने मोठी जिवीतहानी टळली.

Story img Loader