हरियाणातील अंबाला येथे कारने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी आहे. तसेच इतर दोघे जणं किरकोळ जखमी झाले आहेत. दीपक गांधी असे या मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, जखमींना अंबाला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी गुरुग्राममध्ये येथील दिपक गांधी आपल्या पाच मित्रांसह नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिमला येथे जात होता. यावेळी दिल्ली चंदीगड महामार्गावर पोहोचताच त्याने १५० किमी प्रतितास वेगाने गाडी चालवण्याचा प्रयत्न केला. तसेच एकाने याचा व्हिडीओ काढण्यासही सुरुवात केली. मात्र, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट ट्रकला जाऊन धडकली.
दरम्यान, या अपघातात दीपक गांधी यांचा मृत्यू झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंबाला येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दीपक गांधी यांचा मृतदेह शवविच्छेदानंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.