Crime News : देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर आरोपींना तात्काळ आणि कठोरात-कठोर शिक्षेची मागणी केली जाते. यासाठी बऱ्याचवेळी आंदोलने-मोर्चे देखील काढले जातात. अशा घटनांमधील आरोपींना बऱ्याचदा न्यायाच्या कचाट्यातून सुटल्याचेही पाहायाला मिळते. दरम्यान एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीने जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा पीडितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुजरातमधील भरुच येथे ही धक्कादायक घटना उजेडात आली आहे. येथे एका ७० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीने जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा पीडितेवर बलात्कार केला . दरम्यान हा प्रकार उजेडात आल्यानंतर आता आरोपीला तुरूंगात टाकण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार १५ डिसेंबर आणि २२ डिसेंबर रोडी आरोपी शैलेश राठेड याने वृद्ध महिलेच्या शेतातील झोपडीत अत्याचार केले. तसेच याबद्दल वाच्यता केल्यास य़ाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देखील आरोपीने पीडितेला दिली. पीडितेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात नवीन एफआयआर दाखल केला. सध्या सदर व्यक्ती फरार असून आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष पथके तयार केली आहेत.

आरोपीला १८ महिने आधी महिलेवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होता. पण काही दिवसांपूर्वी त्याची जामीनावर सुटका झाली होती, असे पोलिसांनी सांगितले. गुजरातच्या भरूच येथे यापूर्वीही असच प्रकार समोर आला होता. ज्यामध्ये ११ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. ही मुलगी नंतर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. पीडितेने आठवडाभर मृत्यूशी झुंज दिली.

हेही वाचा>> Sunil Tatkare : “यापुढे पक्ष अन् पक्षाच्या शिस्तीला…”, सुनील तटकरे यांच्या विधानाचा रोख कुणाकडे?

लैंगिक अत्याचारात पीडितेला गंभीर दुखापत झाली होती. पीडितेला भरूच जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या अंकलेश्वर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तिला वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात पाठवण्यात आले होते, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकार्‍यांनी दिली.

“दुपारी दोनच्या सुमारास मुलीला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तिची तब्येत खालावत गेली. उपचारानंतर तिची रुग्ण स्थिर झाला पण सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान पुन्हा दुसर्‍यांदा हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी तिला तात्काळ उपचार पुरवले मात्र संध्याकाळी सव्वा सहा वाजता तिला मृत घोषित करण्यात आले”, अशी माहिती एसएसजी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र चौहान यानी दिली