तेलंगणामधील ऑनर किलिंगचा मुख्य आरोपी आणि मुलीचा वडील टी मारुती राव याने पोलिसांनी आपल्याला पकडू नये यासाठी दृश्यम चित्रपटाप्रमाणे प्लान आखला होता. दृश्यम चित्रपटात ज्याप्रमाणे अजय देवगण आपल्या पत्नी आणि मुलींना पोलिसांपासून वाचवण्यासाठी खोटी दृश्यं उभं करत पोलिसांना चकवतो, अगदी तसाच प्रयत्न टी मारुती राव याने केला.
नालगोंडाचे पोलीस अधिक्षक ए व्ही रंगनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपी मारुती राव याने दृश्यम चित्रपटाप्रमाणे खोटे पुरावे उभे करत आपण निर्दोष आहोत असं दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. १४ सप्टेंबरला जेव्हा हत्या झाली त्याच्या दोन तास आधी मारुती राव संयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयात गेला होता. तिथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन हत्या झाली तेव्हा आपण येथेच होतो असं भासवण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी नालागोंडाला जात असताना त्याने उपपोलीस अधिक्षकांना पाहिलं आणि गाडीतून उतरुन त्यांच्याशी गणेशोत्सव तयारीच्या बहाण्याने मुद्दामून चर्चा केली’.
ऑनर किलिंगमधून हत्येसाठी १ कोटींची सुपारी, गँगचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध
गरोदर पत्नीसमोर पतीची हत्या, ऑनर किलिंगचा संशय
आरोपी मारुती रावने इतके प्रयत्न करुनही तो यशस्वी होऊ शकला नाही. आमच्याकडे हत्येत त्याचा हात असल्याने तांत्रिक आणि इतर पुरावे आहेत असं पोलीस अधिक्षक ए व्ही रंगनाथ यांनी सांगितलं आहे.
आरोपी मारुती रावने हत्येचा कट आखत असल्याची कल्पना आपल्या पत्नीलाही लागू दिली नाही. ‘मारुती रावने आपली मुलगी अमृता आणि जावयाची माहिती मिळवण्यासाठी पत्नीचा वापर केला. अमृता गरोदर असल्यापासूनच ती रोज आईशी बोलत होती. १३ सप्टेंबरला अमृताने आईशी बोलताना आपण शनिवारी १४ सप्टेंबरला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात जाणार असल्याची माहिती दिली. पुढे काय होणार आहे याची कल्पना नसणाऱ्या पत्नीने ही माहिती मारुती रावला दिली. मारुती रावने लगेचच ही माहिती अब्दुल बारीला दिली. बारीने असगर अली आणि त्याने सुभाषला कळवलं’, असं रंगनाथ यांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण –
तेलंगणामध्ये गर्भवती पत्नीसमोर पतीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. तेलंगणच्या नालगोंडा जिल्ह्यात रुग्णालयाबाहेर ही धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांना या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले असून पोलिसांनी बिहारमधून मारेकऱ्यासह एकूण सात जणांना अटक केली आहे. २३ वर्षीय प्रणय कुमारची हत्या करण्यासाठी या गँगला १ कोटी रुपयाची सुपारी देण्यात आली होती.
हत्या करणाऱ्या टोळीचे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंध असल्याचीही माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांना सुपारीच्या रक्कमेपैकी १८ लाख रुपये मिळाले होते. मुख्य मारेकरी गुजरातमधील माजी मंत्री हरेन पांडया यांच्या हत्येमध्येही सहभागी होता.
शुक्रवारी प्रणय कुमार नालगोंडा जिल्ह्यातील रुग्णालयातून पत्नी अमृतासोबत बाहेर पडला. त्यावेळी मारेकरी तिथे आला व त्याने धारदार शस्त्राने वार करुन प्रणयची हत्या केली. अमृताने पोलिसांना दिलेल्या जबानीत तिचे वडिल मारुती राव आणि काका श्रवण राव यांच्यावर संशय व्यक्त केला होता. अमृताच्या कुटुंबाचा या आंतरजातीय लग्नाला विरोध होता.
मारुती राव रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे व्यावसायिक आहे. श्रीमंत-प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याचा समावेश होतो अशी माहिती पोलिसांनी दिली. अमृताने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रणयशी लग्न केले होते. माझ्या कुटुंबाकडून धोका असल्यामुळे काही काळ आम्ही लपूनही राहिलो होतो. पण अशा प्रकारे हत्या करतील अशी अपेक्षा केली नव्हती असे अमृताने सांगितले. प्रणय आणि अमृताने जानेवारी महिन्यात लग्न केले होते.