भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या जनचेतना यात्रेदरम्यान २०११ मध्ये पाइपबॉम्ब पेरण्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका २७ वर्षीय युवकाने बुधवारी दंडाधिकाऱ्यांच्या समोरच ब्लेडने हात कापून घेण्याचा प्रयत्न केला.
सदर युवकाचे नाव झाकीर हुसेन असे असून त्याला दंडाधिकारी पनीरसेल्वम यांच्यासमोर हजर करण्यात आले, तेव्हा आपण अतिरेकी नाही, असे सांगून हुसेन याने ब्लेडच्या साहाय्याने हात कापण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. हुसेन हा पोलीस कोठडीत असताना त्याच्याकडे ब्लेड कोठून आले, त्याचा तपास सुरू आहे. पाइपबॉम्ब पेरण्याप्रकरणी पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून त्यांपैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Story img Loader