लग्नाची मागणी नाकारल्याने एका नराधमाने संबंधित तरुणी व तिच्या मैत्रिणीवर अॅसिड फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
पश्चिम दिल्लीतील बागमपूर येथे हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी पार्वत (१८) आणि तिची मैत्रिण गायत्री (१६) या दोघी बाजारात जात असताना त्यांचा शेजारी मनोज(२३) या युवकाने दोघींवर अॅसिड फेकले. हा प्रकार घडत असताना उपस्थित लोकांनी मनोजला थांबविण्याचाही प्रयत्न केला. परंतु, अॅसिड फेकून तेथून पळून जाण्यात मनोज यशस्वी झाला असल्याचेही एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले आहे.
दोघींनाही नजीकच्या आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अॅसिड हल्ल्यात पार्वती पन्नास टक्के, तर गायत्री २० टक्के भाजली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यास सुरूवात केली असून आरोपी मनोजचा शोध घेण्यासही पोलिसांनी सुरूवात केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा