भारतीय वायुदलाच्या सुखोई-३० विमानाने सोमवारी भारत-पाकिस्तान सीमेवरील राजस्थानच्या बिकानेर सेक्टरमध्ये हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या साहाय्याने पाकिस्तानचे एक लष्करी ड्रोन पाडल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. जमिनीवरील रडार स्थानकाने या ड्रोनची नोंद घेतल्यानंतर काही मिनिटांत, म्हणजे सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास सुखोई-३० विमानाने हे ड्रोन पाडले. गेल्या सहा दिवसांत भारतात हेरगिरीसाठी ड्रोन पाठवण्याचा पाकिस्तानने केलेला हा दुसरा अयशस्वी प्रयत्न होता. त्याआधी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आला होता.

Story img Loader