नवी दिल्ली : क्रूझ ड्रग प्रकरणाचा तपास करणारे अमली पदार्थ विक्री नियंत्रण विभागातील (एनसीबी) तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्याचा आदेश केंद्र सरकारने (पंतप्रधान कार्यालय) केंद्रीय अर्थ मंत्रालयाला दिला असल्याचे समजते. त्यामुळे ‘एनसीबी’तून यापूर्वीच उचलबांगडी झालेल्या वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

चित्रपट अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह सहा जणांना ‘एनसीबी’ने सबळ पुराव्याअभावी शुक्रवारी निर्दोष सोडले. ‘एनसीबी’ने न्यायालयात दाखल केलेल्या ६ हजार पानांच्या आरोपपत्रात आर्यन खानचा समावेश नाही. आयर्म्न खान याने अमली पदार्थ बाळगल्याचा वा त्याचे सेवन केल्याचा पुरावा नसल्याचे ‘एनसीबी’ने स्पष्ट केले.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
drugs parli connection loksatta news
“गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जचे परळी कनेक्शन”, आमदार सुरेश धस यांचा धाराशिवमध्ये गौप्यस्फोट
purchase of educational systems will be done through tendering Municipal Corporations Education Department clarified
टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!
Supreme Court order regarding the dispute over a private well near the entrance of Sambhal Jama Masjid
संभलमधील स्थिती ‘जैसे थे’, न्यायालयाचा आदेश; विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मज्जाव

‘एनसीबी’च्या नि:संदिग्ध भूमिकेमुळे ड्रग प्रकरणाच्या चौकशीत वानखेडे यांनी ढिसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. एनसीबीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर या प्रकरणातील घडामोडींची तातडीने दखल घेत केंद्र सरकारने वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ड्रग प्रकरणात आर्यन खान याला वानखेडे यांनी अटक केली होती. मात्र, वानखेडे यांनी क्रूझवर झालेल्या कारवाईचे चित्रण केले नाही, अटक केल्यानंतर आर्यन तसेच, अन्य पाच जणांची अमली पदार्थाच्या सेवनासंदर्भातील रक्ताची नमुना चाचणी झाली नाही, साक्षीदारांच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या, अशा तपासामध्ये अनेक त्रुटी राहिल्याचे ‘एनसीबी’ला आढळले होते. त्यामुळे क्रूझ ड्रग प्रकरणाचा चुकीच्या पद्धतीने व निष्काळजीपणे वानखेडे यांनी केलेल्या तपासाची सक्षम यंत्रणेकडून चौकशी केली जाणार आहे.

बनावट जात प्रमाणपत्र सादर करून वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर वानखेडे यांची ‘एनसीबी’तून हकालपट्टी झाली होती व त्यांना मूळ केंद्रीय महसूल सेवा विभागामध्ये परत पाठवण्यात आले होते. वानखेडे ‘एनसीबी’मध्ये कार्यरत नसल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाला त्यांच्याविरोधात कारवाई करता येत नाही. सध्या वानखेडे हे ‘कस्टम व एक्साइज’ विभागात कार्यरत आहेत. हा विभाग केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारित असल्याने वानखेडे यांच्याविरोधात निर्मला सीतारामन यांच्या मंत्रालयाकडून ‘कस्टम व एक्साइज’ विभागाला वानखेडेंविरोधात चौकशी करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

सरकारी नोकरीवर गदा?

‘एनसीबी’चे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचे पुरावे नवाब मलिक यांनी दिले होते. वानखेडे हे अनुसूचित जातीतील नसून मुस्लिम असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. या प्रकरणाची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने घेतली होती. वानखेडे यांनी आपण अनुसूचित जातीतील असून नोकरी मिळवताना जातीचा मूळ दाखला सरकारला सादर केल्याचा दावा वानखेडे यांनी आयोगासमोर केला होता. वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाचीही चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बनावट कागदपत्रे सादर केल्याचे सिद्ध झाल्यास वानखेडे यांच्या सरकारी नोकरीवर गदा येऊ शकते.

अमली पदार्थ नियंत्रण विभागावरील नवाब मलिक यांचे आरोप खरे; केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका

मुंबई : कर्डिलिया क्रूझवरील अमली पदार्थाच्या पार्टीत प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अमली पदार्थ नियंत्रण विभागाने केलेली अटक हा पूर्वनियोजित कट होता आणि मंत्री नवाब मलिक यांनी या यंत्रणेवर केलेले आरोप सत्य असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तत्कालीन वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी  काँग्रेस व राष्ट्रवादीने शुक्रवारी केली.

महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे भाजपचे सुरुवातीपासूनच मनसुबे आहेत. त्यासाठी ईडी, प्राप्तिकर विभाग, सीबीआय, एनआयए, एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून बनावट कारवाया करण्यात आल्या आहेत. मंत्री नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अशा षडय़ंत्राचे बळी ठरले आहेत. अभिनेता सुशांतसिंह प्रकरणातही राज्य सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले गेले, असे लोंढे यांनी म्हटले आहे.

फर्जीवाडा उघड

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचा फर्जीवाडा उघड करीत वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर केलेले आरोप सत्य ठरले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी नमूद केले. या क्रूझवर घातलेल्या धाडीमध्ये अमली पदार्थ नियंत्रण विभागाने भाजपशी संबंधित व्यक्ती पंच म्हणून नेमले होते, तेही बोगस निघाले. एका पंचाचा अनैसर्गिक मृत्यूही झाला असून आर्थिक देवाणघेवाण झाल्याचीही चर्चा पुढे आली होती. नवाब मलिक यांनी घेतलेल्या आक्षेपांमध्ये तथ्य होते, हेच दिसून आल्याचे तपासे यांनी म्हटले आहे.

क्रूझ पार्टी प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय संबंध नाही; एनसीबी महासंचालकांचे स्पष्टीकरण

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझवरील अमली पदार्थ पार्टी प्रकरणात आर्यन खानविरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत आणि तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ टोळीचा भाग नाही. शिवाय याप्रकरणी अमली पदार्थाशी संबंधित गुन्ह्याचा कटही रचला गेलेला नाही, असे केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी स्पष्ट केले. एनसीबीच्या मुंबई पथकाने या प्रकरणाच्या केलेल्या तपासात गंभीर अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे त्याच्या तपासाअंती आर्यनला अटक करणाऱ्या माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखालील पथकावर चौकशीअंती योग्य ती कारवाई केली जाईल, असेही प्रधान यांनी यावेळी सांगितले. मुबंईतील विशेष न्यायालयात सहा हजार पानी आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रधान यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. आर्यनसह सहाजणांविरूद्ध परिस्थितीजन्य पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळेच त्यांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आलेला नाही, असेही प्रधान यांनी सांगितले.

Story img Loader