Jindal Steel Dinesh Saraogi : कोलकाताहून अबू धाबीला जाणाऱ्या विमानात एका तरुणीबरोबर लैंगिक अत्याचारा प्रकार घडला होता. पीडित तरूणीने एक्सवर सविस्तर पोस्ट टाकून या अत्याचाराला वाचा फोडली. तसेच ज्या व्यक्तीने हे कृत्य केले होते, त्याच्या नावासह तक्रार केली होती. जिंदल स्टील या नामांकित कंपनीचे वरीष्ठ अधिकारी आणि जिंदल स्टिलच्या ओमान येथील व्हल्कन ग्रीन स्टील या कंपनीचे सीईओ दिनेश कुमार सरोगी यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. यानंतर आता सरोगी यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना कंपनीतून पायउतार होण्यास सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकरण काय?

पीडित तरूणी अनन्या छोछरिया इतिहाद कंपनीच्या विमानाने कोलकाताहून अबू धाबीला जात होती. अबू धाबीहून तिला लंडनची कनेक्टेड फ्लाईट पकडायची होती. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये तिने म्हटले की, माझ्या शेजारी जिंदल कंपनीचे सीईओ दिनेश सरोगी बसले होते. त्यांचे वय जवळपास ६५ पर्यंत असावे. त्यांनी मला त्यांच्याबद्दल माहिती दिली आणि माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आमचा संवाद पुढे जात असताना त्यांनी माझे छंद काय आहेत, हे जाणून घेतले. ते म्हणाले की, तुला चित्रपट पाहायला आवडतात का? मी हो म्हटल्यानंतर त्यांनी त्यांचा फोन बाहेर काढला आणि त्यावर काही चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले. फोन आणि इअरफोन बाहेर काढून त्यांनी मला पॉर्न व्हिडीओ दाखविले आणि मला जवळ ओढायला लागले. या प्रकारामुळे मला धक्काच बसला आणि भीतीही वाटली.

हे वाचा >> Naveen Jindal: “विमानात पॉर्न व्हिडीओ दाखविला, मला जवळ…”, जिंदल स्टिलच्या सीईओंवर महिला सहप्रवाशाचे गंभीर आरोप

“दरम्यान मी वॉशरुमला जायचे असल्याचे सांगून तिथून उठले आणि तिथून निसटले. एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना याबाबत तक्रार केली. इतिहास एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनीही झाल्या प्रकाराची तातडीने दखल घेऊन मला मदत केली. कर्मचाऱ्यांनी मला ते बसतात त्याठिकाणी बसू दिले आणि चहा, फळे खायला दिली. मात्र तरीही ते सीईओ माझ्याबद्दल कर्मचाऱ्यांना विचारणा करत होते. दरम्यान कर्मचाऱ्यांनी अबू धाबीमधील पोलिसांनाही याची माहिती दिली. विमान उतरताच त्यांनी सीईओंना ताब्यात घेतले”, अशी माहिती अनन्याने दिली.

दरम्यान अनन्याने नवीन जिंदल यांना टॅग करून तक्रार केल्यानंतर त्यांनीही याचा निषेध व्यक्त केला. या प्रकाराचे कुणीही समर्थन करू शकत नाही. आमची कंपनी अशा प्रकारांना खपवून घेत नाही. आम्ही याचा संपूर्ण तपास करून कारवाई करू, असे त्यांनी आश्वासित केले.

कंपनीतून पायउतार होण्यास भाग पाडले

नवीन जिंदल यांनी स्वतःच या प्रकाराची दखल घेतल्यानंतर आता सरोगी यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. व्हल्कन ग्रीन स्टीलने आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटले की, दिनेश कुमार सरोगी यांनी आपल्या पदााच राजीनामा दिला आहे. तसेच जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडने याची माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजला पत्राद्वारे दिली आहे. दिनेश कुमार सरोगी यांचा आता आमच्या कंपनीशी कोणताही संबंध नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action taken against jindal executive officer who showed porn and groped women on filght kvg
Show comments