पीटीआय, नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखर वाढल्यानंतर त्यांना कमी मात्रेत इन्सुलिन देण्यात आले अशी माहिती तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. यानंतर, हे हनुमानाच्या कृपेमुळे घडले अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी हनुमान जयंतीच्या निमित्त सुनीता केजरीवाल यांनी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि प्रार्थना केली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एम्स’च्या डॉक्टरांच्या सल्ल्यावरून सोमवारी संध्याकाळी केजरीवाल यांना कमी मात्रेच्या इन्सुलिनचे दोन एकक देण्यात आले. संध्याकाळी सातच्या सुमाराला त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी २१७च्या आसपास होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असलेल्या डॉक्टरांनी त्यांना इन्सुलिनची मात्रा देण्याचा निर्णय घेतला असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या रक्तातील साखर एका विशिष्ट पातळीच्या वर गेली तर त्यांना इन्सुलिन देता येईल असे ‘एम्स’च्या तज्ज्ञांनी २० एप्रिलला केजरीवाल यांच्याबरोबर झालेल्या दूरदृश्य प्रणालीमार्फत संभाषणादरम्यान तिहारच्या डॉक्टरांना सांगितले होते, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>>“राहुल गांधींचा ‘डीएनए’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची टीका

आपकडून हनुमानाला श्रेय

आम आदमी पक्षाने केजरीवाल यांना इन्सुलिन मिळाल्याचे श्रेय थेट हनुमानाला दिले. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मंगळवारी हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनीही कॅनॉट प्लेस येथील मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले.

Story img Loader