कर्नाटकातील जगदीश शेट्टर सरकार सध्या अस्थिर झाले आहे. भाजपमधील १३ आमदारांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना पाठिंबा देत त्यांनी काढलेल्या रॅलीत सहभाग घेतला होता. तसेच त्यांच्या व्यासपीठावरही उपस्थिती दर्शविली होती. या १३ आमदारांवर कारवाई संदर्भात १२ डिसेंबरला पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले. येडीयुरप्पा यांनी कर्नाटक जनता पक्षाची नुकतीच स्थापना केली. त्यामुळे अडचणीत आलेले शट्टर सरकार बरखास्त करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र विरोधकांची ही मागणी मुख्यमंत्री शेट्टर यांनी धुडकावून लावली आहे. तर येडीयुरप्पा आणि काँग्रेसची मिलीभगत असून अद्याप काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात अवाक्षरही काढण्यात आले नसल्याचा आरोप उच्च शिक्षणमंत्री सी. टी. रवी यांनी केला आहे.
येडीयुरप्पा समर्थक १३ आमदारांवर कारवाई होणार
कर्नाटकातील जगदीश शेट्टर सरकार सध्या अस्थिर झाले आहे. भाजपमधील १३ आमदारांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना पाठिंबा देत त्यांनी काढलेल्या रॅलीत सहभाग घेतला होता.
First published on: 11-12-2012 at 05:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action will be taken on 13 yeddyurappa supporter mla