Actor Dashan : अभिनेता दर्शन याने रेणुकास्वामी हत्या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. या प्रकरणातल्या सुनावणी दरम्यान त्याने रेणुकास्वामी हा समाजासाठी घातक होता म्हणून त्याची हत्या केली असं धक्कादायक विधान केलं आहे. रेणुकास्वामी महिलांना अश्लील मेसेज करायचा, नग्न व्हिडीओज आणि फोटो पाठवायचा त्यामुळे त्याला ठार केलं असंही अभिनेता दर्शनने ( Actor Dashan ) म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दर्शनचे वकील सी.व्ही नागेश काय म्हणाले?

दर्शनचे वकील सी.व्ही नागेश यांनी न्यायालयाला सांगितलं की रेणुकास्वामीला महिलांबाबत मुळीच आदर नव्हता. तो महिलांना पॉर्न व्हिडीओ आणि नग्न फोटो पाठवत होता. त्याने अनेक महिलांना असे व्हिडीओ पाठवले होते. गौतम या नावाने त्यांना रेणुकास्वामी मेसेज पाठवत होता. त्याने फक्त एका महिलेला नाही तर अनेक महिलांना असे मेसेज पाठवले आणि त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला महिलांबाबत मुळीच आदर किंवा सन्मान नव्हता. त्याने आरोपी क्रमांक १ म्हणजेच पवित्रा गौडा यांनाही अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले होते.

९ जूनला आढळला रेणुकास्वामीचा मृतदेह

९ जूनला रेणुकास्वामीचा मृतदेह बंगळुरु पश्चिमेला असलेल्या कामाकाशीपलाया येथील गटारात सपाडला होता. या प्रकरणात दोन दिवसांनी अभिनेता दर्शन ( Actor Dashan ) आणि त्यांची मैत्रीण पवित्रा गौडा या दोघांना अटक करण्यात आली. यानंतर अभिनेता दर्शनची बाजू मांडताना त्याच्या वकिलांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

दर्शन यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला पण ते तर खरे हिरो-नागेश

सी.व्ही. नागेश पुढे म्हणाले ज्या माणसाची हत्या दर्शन ( Actor Dashan ) यांनी केली तो रेणुकास्वामी असा माणूस होता ज्याला महिलांबाबत मुळीच आदर नव्हता. त्याला तो आदर ठेवायचाही नव्हता. या प्रकरणात माझे अशील दर्शन यांना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला. मात्र माझे अशील दर्शन हे फक्त पडद्यावरचे नाहीत तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातलेही नायक आहेत. असं म्हणत नागेश यांनी युक्तिवाद केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

२८ नोव्हेंबरला पुढची सुनावणी

या प्रकरणात न्यायमूर्ती विश्वजीत शेट्टी यांनी नागेश यांनी त्यांचे अशील दर्शन यांची जामिनाबाबतची याचिका आणि त्यावरील युक्तिवाद दोन तास ऐकला. त्यानंतर आता या प्रकरणात २८ नोव्हेंबरला सुनावणी होईल असं सांगितलं आहे. नागेश यांनी या प्रकरणात पोलिसांकडून तपासात काही त्रुटी राहिल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी अॅटोप्सी करायला वेळ लावला असंही दर्शन यांचे वकील नागेश यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
रेणुकास्वामीच्या शवविच्छेदन अहवालात काय समोर आलं?

रेणुकास्वामीचा शवविच्छेदन अहवाल काय सांगतो?

रेणुकास्वामीच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे. या अहवालानुसार त्याची हत्या मानसिक धक्का आणि ब्रेम हॅमरेजुळए झाली. रेणुकास्वामीने दर्शन यांची मैत्रीण पवित्रा गौडाला अश्लील मेसेज केले होते. त्यानंतर दर्शन यांनी रेणुकास्वामीची हत्या करण्याची सुपारी दिली. यानंतर पोलिसांनी दर्शन आणि पवित्रा दोघांनाही अटक केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor darshan tell karnataka hc no respect for women sent nude photos renukaswami was menace to society scj