कोलकाता : भाजपवासी झालेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्यास आपली तयारी आहे. आता पक्षाने काय तो निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.

भाजपने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. या पदासाठी  मिथून  इच्छुक असल्याचे दिसून येते. मिथून म्हणाले की,  माझ्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असेल तर मी नक्कीच मुख्यमंत्री होईल.  पण हा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा आहे.  मोदींनी आदेश दिल्यास आपण  ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार आहोत, असेही मिथून म्हणाले.

Story img Loader