पंजाबमधील राज्यसभेच्या पाच जागांवर निवडणूक होणार असून पंजाब विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने सत्तेवर आलेल्या आम आदमी पार्टीचा पाचही जागांवर विजय निश्चित मानला जात आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा केलेली आहे. यामध्ये पंजाबचे प्रभारी राघव चढ्ढा, क्रिकेटपटू हरभजन सिंग, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे (एलपीयू) संस्थापक अशोक मित्तल, उद्योगपती संजीव अरोरा आणि पक्षाचे रणनीतीकार संदीप पाठक यांना आम आदमी पार्टी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. यातील संदीप पाठक यांच्या निवडीनंतर महाराष्ट्रातील अभिनेते संदीप पाठक यांना ट्वीटरवर एख पोस्ट करावी लागल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कारण, अनेक चॅनलवर आम आदमी पार्टीचे रणनीतीकार संदीप पाठक यांच्या जागी चित्रपट अभिनेते संदीप पाठक यांचाच फोटो वापरला गेला. शिवाय, सोशल मीडियावर देखील अभिनेते संदीप पाठक यांचा फोटो आम आदमी पार्टीशी जोडला जात आहे. त्यामुळे अखेर अभिनेते संदीप पाठक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “आप”ल्याला ह्यात ओढू नका अशी विनंती केली आहे.

“तो मी नव्हेच आपचे डॅा. संदीप पाठक यांची पंजाबमधून राज्यसभेवर निवड झाली आहे, माझी नाही. बऱ्याच ठिकाणी, काही चॅनलवर माझे फोटो वापरत आहेत. “आप”ल्याला ह्यात ओढू नका.” असं ट्वीट अभिनेते संदीप पाठक यांनी केले आहे.

कोण आहेत ‘आप’चे रणनीतीकार संदीप पाठक? : –

संदीप पाठक यांना त्याच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. संदीप हे अरविंद केजरीवाल यांच्या कोअर टीमचे प्रमुख सदस्य आहेत आणि आयआयटी दिल्लीमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. पंजाबमध्ये ‘आप’च्या विजयात पडद्यामागे संदीप पाठक यांची फार महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते. संदीप अनेक वर्षांपासून ‘आप’साठी रणनीतीचे काम करत आहेत आणि पंजाबमध्येही त्यांनी ‘आप’साठी एक अनोखी रणनीती बनवली होती.

पंजाबमध्ये संदीप यांनी गोपनीय पद्धतूने काम केले, ते लाइमलाइटपासून दूर राहिले. उमेदवार निवडीपासून ते जाहीरनामा तयार करण्यापर्यंत संदीप पाठक यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं बोललं जातं. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या मोठ्या विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांनी संदीप पाठक यांचेही कौतुक केले आहे.