अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांची भेट घेतल्याने आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येते आहे. दीपाली सय्यद यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. यावरुन दीपाली सय्यद यांना खूप ट्रोल केलं जातं आहे. त्यांच्या या फेसबुक पोस्टवर लोक विविध पद्धतीने व्यक्त होत आहेत. महिला मल्लांनी ज्या ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचे आरोप केले आणि आंदोलन केलं त्यांची भेट तुम्ही कशी काय घेतली असा प्रश्न काही लोकांनी विचारला आहे.

दीपाली सय्यद यांनी पोस्ट केलेला फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरुन त्यांच्यावर चांगलीच टीका होते आहे. आनंद देशमुख नावाचे युजर म्हणतात, ‘बलात्काराचे आरोप असणाऱ्या ना लायक माणसाला कसल्या शुभेच्छा देता?’, सम्राट३५८ नावाचा युजर म्हणतो, ‘एका स्त्रीचा अपमान करणारा माणूस एक स्त्री जवळ कशी करु शकते हा विचार माझ्या मनात आला, राजकारणाची पातळी खालावली अशा लोकांमुळे’ असं म्हटलं आहे. ‘राक्षसाचे कौतुक कशाला करता?’ असं ज्ञानेश्वर इंगळे नावाच्या युजरने म्हटले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना शुभेच्छा दिल्याने दीपाली सय्यद ट्रोल

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. या आरोपांनंतर देशभरात एकच खळबळ उडाली. याच आरोपांनंतर न्याय मिळण्यासाठी महिला कुस्तीपटूंनी दिल्लीतल्या जंतरमंतर या ठिकाणी धरणे आंदोलनही केले. ब्रिजभूषण सिंह यांच्यावरच्या आरोपांचा हा मुद्दा देशपातळीवर चर्चेचा विषय ठरला.

सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर पोलिसांत तक्रार दाखल केलेली आहे. या सात तक्रारदारांची नावे समोर आलेली नाहीत. सर्वोच्च न्यायालयानेदेखील ही नावे सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला. एकूण सात कुस्तीपटूंपैकी साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हे तीन कुस्तीपटू या प्रकरणात आघाडीवर असल्याचं पाहण्यास मिळालं.. कुस्तीपटूंनी जानेवारी महिन्यात ब्रिजभूषण यांच्याविरोधात पहिल्या टप्प्यातील आंदोलन केले होते. या आंदोलनात अंशू मलिक, सोनम मलिक, रवी दहिया, दीपक पुनिया आदी कुस्तीपटूंनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. तर या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात सध्या तरी फक्त साक्षी मलिक, विनेश फोगाट, आणिं बजरंग पुनिया यांनी आंदोलन केलं.

ब्रिजभूषण सिंह कोण आहेत?

ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशमधील राजकारणी असून त्यांनी आतापर्यंत सहा वेळा खासदारकीची निवडणूक जिंकलेली आहे. १९९१ आणि १९९९ साली त्यांनी गोंडा मतदारसंघातून विजय मिळवला होता. तर २००४ साली त्यांनी बलरामपूर येथून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. २००९, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कैसरगंज येथून विजयी कामगिरी करून दाखवली होती. २००९ ची लोकसभा निवडणूक वगळता बाकी सर्वच निवडणुकांमध्ये ब्रिजभूषण सिंह भाजपाचे उमेदवार होते. २००९ साली त्यांनी समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. तसेच बाबरी मशीद खटल्यातही त्यांचे नाव होते.

Story img Loader