भारतीय अभिनेत्री आणि प्रसिद्ध व्हीजे सोफिया हक हिचे येथील रुग्णालयात न्यूमोनियाच्या विकाराने निधन झाले. ती ४१ वर्षांची होती. न्यूमोनियाच्या विकारावर तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिच्या फुफ्फुसात रक्ताची गुठळी तयार झाली आणि तिचे झोपेतच निधन झाले. सोफिया हक आपला सहकारी आणि संगीत दिग्दर्शक डेव्हिड व्हाइट याच्यासमवेत लंडनमध्ये वास्तव्यास होती. नाताळच्या सणापूर्वीच ती आजारी पडली होती. सोफियाला कर्करोगानेही ग्रासले असल्याचे निदान काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. गुरुवारी रात्री तिचे झोपेतच निधन झाले, असे ‘कोल किचन’ या एजन्सीने स्पष्ट केले आहे.

Story img Loader